बायकोसाठी कायपण! स्वत:ची मॅच सोडून निघाला तिच्या फायनलला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 7 मार्च 2020

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आपल्या पत्नीसाठी स्वतःच्या सामन्यावर पाणी सोडणार आहे. येत्या रविवारी मेलबर्न येथे होणाऱ्या महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पत्नी अलिसा हिली हिला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्क स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे. त्यासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आपल्या पत्नीसाठी स्वतःच्या सामन्यावर पाणी सोडणार आहे. येत्या रविवारी मेलबर्न येथे होणाऱ्या महिला विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पत्नी अलिसा हिली हिला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्क स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे. त्यासाठी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा अखेरचा एकदिवसीय सामना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा - Web विशेष | दुपारी पोटभर जेवल्यानंतर झोपायला जाणं जीवावर बेतू शकतं

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यातील अखेरचा सामना शनिवारी होत आहे आणि रविवारी महिला विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. स्वतःचा सामना सोडून मिशेल स्टार्क मेलबर्नमध्ये परत येणार आहे.

यष्टिरक्षक फलंदाज असलेली अलिसा हिली ही ऑस्ट्रेलिया महिला संघाची सलामीवीर आहे. महिला विश्‍वकरंडक स्पर्धेचे ऑस्ट्रेलियाने चार वेळा विजेतेपद मिळवलेले आहे. रविवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनी आपले विजेतेपद राखण्यासाठी त्यांची लढत भारताविरुद्ध होणार आहे.

हे ही वाचा - 'बेबो' करिनाची इन्स्टाग्रामवर धडाक्यात एन्ट्री

घरच्या मैदानावर विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या पत्नीचा खेळ पाहण्याची अशी संधी अपवादाने मिळते. मिशेलला ती मिळाली आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत, असे ऑस्ट्रेलिया पुरुष संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी सांगितले. मिशेल हा आमचा सर्वांत हुकमी गोलंदाज आहे. त्याच्यावरील सामन्यांच्या ताणाचाही आम्ही विचार करत आहोत. तिन्ही प्रकाराच्या सामन्यांत तो खेळतो. काही दिवसांनंतर आम्ही मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी- 20 मालिका खेळणार आहोत. त्यापूर्वी मिशेलला विश्रांती मिळणे महत्त्वाचे होते, असेही लॅंगर यांनी स्पष्ट केले.
मिशेल स्टार्कची अनुपस्थिती म्हणजे इतर गोलंदाजांना संधी मिळणार आहे. ज्योश हॅझलवूड, जेय रिचर्डसन किंवा केन रिचर्डसन यापैकी आम्ही एकाला संधी देऊ, असे लॅंगर यांनी म्हटले आहे.

आक्रमक अलिसा
अलिसा हिली ही आक्रमक शैलीची फलंदाज असून, नाबाद 148 ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. 2 ऑक्‍टोबर 2019 रोजी तिने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 148 धावांची खेळी केली होती. या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताने सलामीला ऑस्ट्रेलियाला हरविले होते; परंतु अलिसा एकाकी लढली होती. तिने 35 चेंडूंत 51 धावा केल्या होत्या.

Web Title mitchell starc returns home final alyssa healy womens t20 world cup


संबंधित बातम्या

Saam TV Live