आमदार आशिष शेलार यांनी केले नरेंद्र पाटील यांचे तोंड भरुन कौतुक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. तर नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे कर्तुत्ववान नेते आहेत. ते महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन जोमाने कार्य करतील, अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.

मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. त्या स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांचे कर्तुत्ववान सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचेवर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा सोपविली असल्याचा उल्लेखही आमदार आशिष शेलार व आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या भाषणातून केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात स्विकारला. त्याप्रसंगी आमदार आशिष शेलार व आमदार प्रविण दरेकर बोलत होते.

मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची सरकारकडे मागणी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केली. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी त्यांनी पहिले बलिदान दिले. अण्णासाहेबांच्या म्हणजे वडिलांच्या नावाने राज्य सरकारने स्थापन केलेल्या आणि सध्याच्या सरकारने पुनर्रजिवीत केलेल्या महामंडळाच्या अध्यक्ष पदी मला काम करण्याची संधी मिळाली. अण्णासाहेबांचे अपुर्ण स्वप्न साकार करण्यासाठी आणि माथाडी कामगारांच्या मुलांना व मराठा समाजातील तरुणांना महामंडळाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेऊ, अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली.

महामंडळावरील अध्यक्ष पदाची निवड ही भावनिक आहे, अण्णासाहेबांच्या नावाने असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करण्याची मिळालेली संधी ही भाग्य असल्याचेही ते म्हणाले. महामंडळाच्या अध्यक्ष पदाची धुरा सोपविल्याबद्दल राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि भाजप पक्षाच्या नेत्यांचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताना त्यांच्या धर्मपत्नी व प्राना फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्राची नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस वसंतराव पवार, चंद्रकांत पाटील, खजिनदार गुंगा पाटील, कायदेशीर सल्लागार व महामंडळाच्या माजी संचालिका अॅड. भारतीताई पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील, सेक्रेटरी व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, मराठा आरक्षण मोर्चाचे संयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, माथाडी कामगार मुकादम, उपमुकादम, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live