अखेर आमदार भालेरावांनी घेतली माघार

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

उदगीर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघा साठी भाजपाने विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी नाकारून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. यावर नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे आमदार भालेराव यांनी आज अखेर माघार घेतली आहे.

उदगीर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघा साठी भाजपाने विद्यमान आमदार सुधाकर भालेराव यांची उमेदवारी नाकारून अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. यावर नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे आमदार भालेराव यांनी आज अखेर माघार घेतली आहे.

सोमवारी ता 7 आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली भारतीय जनता पार्टी दहा वर्षे संधी दिली मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असून माझी उमेदवारी लावली तरी मी माजी अपक्ष उमेदवारी माघार घेऊन भाजपचे उमेदवार अनिल कांबळे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व जनतेने ही त्यांना भरघोस मते देऊन विजयी करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दोन दिवसापूर्वी आमदार भालेराव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपावर व जिल्हास्तरीय वरील नेतृत्वावर सडकून टीका केली होती हा पक्ष म्हणजे आता दलालांचा पक्ष झाल्याचे त्यांनी सांगितले होते मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

यापुढील काळात मला व माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक पक्षाकडून दिली जाईल. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे मी हा माघारीचा निर्णय घेत असल्याचेही यावेळी आमदार भालेराव यांनी सांगितले.

पक्षाच्या कामात सक्रिय होणार
यावेळी आमदार भालेराव यांनी सांगितले की पक्षाच्या कामात सक्रिय होणार असून महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात आवश्यक असेल तेथे जाऊन काम करणार आहे.  शिवाय उदगीर मतदारसंघातही सक्रियपणे काम करून डॉ. कांबळे यांना भरघोस मतांनी निवडून आणणार.

Web Title: MLA Bhalerao withdraws from election
 


संबंधित बातम्या

Saam TV Live