मिया बीबी राजी; आमदार पापाकी नाराजी..  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 जुलै 2019

एकदा ऐकाच साक्षी मिश्रा काय म्हणतायत. त्यांच्या जीवाला धोका आहे आणि तो सुद्धा त्यांच्या वडिलांपासूनच. कारण काय तर जातीबाहेर आणि त्यांच्या विरोधात लग्न केलं म्हणून. साक्षी आणि तिचे पती अजितेश कुमार यांच्या मागे साक्षीच्या वडिलांनी गुंड पाठवलेत. साक्षीचे वडिल हे उत्तर प्रदेशमधले भाजपचे आमदार आहेत. घाबरलेल्या साक्षीनं अखेर सोशल मीडियाचा आधार घेतलाय. 

कोणत्याही क्षणी या दोघांचा खून होऊ शकतो अशी भीती साक्षीला असल्यानं तिनं सोशल मीडियावरुन मदत मागितलीय तसंच पोलिसांनाही आपल्याला प्रोटेक्शन देण्याची मागणी केलीय. पळून पळून दमल्याचं साक्षीनं सांगितलं. आनंदी आणि मुक्त जगायचंय, लपत-छपत नाही असं साक्षी काकुळतीनं सांगतेय. 

आपण किती वर्ष आणखी जातीबाहेर लग्न केल्यानं पोटच्या पोरीच्या जिवावर उठणार आहोत. तिच्या आनंदाचा, तिच्या स्वातंत्र्याचा विचार होणार आहे की नाही. लोकप्रतिनिधीच असं वागत असतील, तर सामान्य लोक त्यांचाच आदर्श घेऊन पुढे चालतात. हे गंभीर आहे आणि थांबणं गरजेचं आहे. 

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

संबंधित बातम्या

Saam TV Live