शेतकऱ्यानं शेतातच साकारली शरद पवारांची प्रतिकृती

शेतकऱ्यानं शेतातच साकारली शरद पवारांची प्रतिकृती

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एका शेतकऱ्याने साडेचार एकर शेतीत हरभरा आणि (आळीव गहू) या पिकाची कल्पकतेने पेरणी करुन त्यात शरद पवार यांचे अनोखे चित्र साकारले आहे. याचीच सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.  

रोहित य़ांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की,   उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी या गावातील मंगेश निपाणीकर या शेतकरी पुत्राने आपल्या साडेचार एकर शेतीत हरभरा आणि (आळीव गहू) या पिकाची कल्पकतेने पेरणी करुन त्यात आदरणीय शरद पवार साहेबांचे अनोखे चित्र साकारले आहे.

एका शेतकऱ्याने एखाद्या नेत्याची ही सर्वात मोठी ग्रास पेंटींग आहे. साहेबांवर निपाणीकर यांचे हे प्रेम पाहून मनापासून आनंद वाटला. हे प्रेम शब्दांत वर्णन करता न येण्यासारखं आहे आणि लोकांचं हे प्रेम हिच आजवर साहेबांची ताकद राहिली आहे.

ही प्रतिमा साकारण्यासाठी शेतीची मशागत, पेरणी, सिंचन आणि उगवण यासाठी निपाणीकर यांना 15 दिवस अविरत प्रयत्न करावे लागले. साडेचार एकर क्षेत्रात सूक्ष्म रेखांकन करून पेरणी केली आणि नंतर जे उगवलं ते सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणारं दृष्य होतं.

निपाणीकर यांनी साकारलेली ही अफलातून कलाकृती पाहण्यासाठी पवार साहेबांवर प्रेम करणारे लोक मोठी गर्दी करत आहेत. आजवर पवार साहेबांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या कल्याणासाठी केलेले प्रयत्न पाहता एका शेतकरी पुत्राने त्यांना आपल्या शेतातून अशा अनोख्या प्रकारे दिलेल्या शुभेच्छा याचं मोल हे माझ्यासाठी नक्कीच अमोल आहे, असंच मी म्हणेन. रोहित पवार यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियात खुप चर्चेत आहे.

Web Title: MLA Rohit Pawars post goes viral on social media

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com