पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे?  थिएटरमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मनसे आक्रमक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मल्टिप्लेक्समध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे आकारण्यात येत असल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध आंदोलन केले. 

पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे? 10 रुपयांचा वडापाव शंभर रुपयांना कसा? असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी सेनापती बापट रोडवरील PVR मध्ये घोषणाबाजी केली.

या प्रश्नावर पीव्हीआरच्या प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे व्यवस्थापक आणि कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची झाली. त्यानंतर व्यवस्थापकाच्या कानशिलातही लगावण्यात आली. या घटनेनंतर मारहणा करणाऱ्या मनसेच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live