पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह डाव्यांनी पुकारलेल्या  भारत बंदला मनसे आणि राष्ट्रवादी पाठिंबा 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणिक वाढतायेत. वाढत्या महागाईनं जगायचं कसं? हाच प्रश्न सामान्यांपुढे पडलाय. त्यामुळे महगाईविरोधात विरोधकांनी एल्गार पुकारलाय. काँग्रेस आणि डाव्यांनी सोमवारी भारत बंदची हाक दिलीय. कुठे गेले अच्छे दिन हा सवाल करत विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलंय. 

या भारत बंदमध्ये इतर पक्षियांनी सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसनं केलं होतं त्याला मनसे आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दर्शवलाय. बंद असल्यानं गणेशोत्सवासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजल्यानंतरच घराबाहेर पडण्याचं आवाहन मनसेनं केलंय. तर इतक्या दिवसात पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून वसूल केलेल्या टॅक्सचं काय झालं असा सवाल राष्ट्रवादीनं केलाय. 

गेल्या 15 दिवसांपासून सलग पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत त्याचा थेट परिणाम महागाईवर होतोय. एकीकडे शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी हतबल आहे तर दुसरीकडे इंधनावरील अधिभार कमी करण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत. याच मुद्यावर विरोधकांनी आता सरकारविरोधात मोट बांधायला सुरूवात केलीय. विशेष म्हणजे विरोधकांनी दिलेल्या बंदच्या आवाहनाला सगळ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. सरकारसाठी निश्चितच ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live