काँग्रेसच्या बंदला मनसेचं बळ 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबईतलं मेट्रो रोखण्याचं आंदोलन असो की, चेंबूरची तोडफोड. पुण्यात बसवर भिरकावलेला दगड किंवा मुंबईत भाजपच्या ऑफिसची केलेली तोडफोड. 

काँग्रेसच्या बंदमध्ये फक्त मनसेचाच आवाज होता. मनसेच्याच आवाजानं मुंबई पुणे आणि नाशिकसारख्या महानगरांमध्ये आंदोलनाचा परिणाम दिसला. मुंबईकरांची आजची सकाळ नेहमीप्रमाणं उगवली. सुरूवातीला बंदचा परिणाम दिसला नाही.

पण जेव्हा मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तेव्हा मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला. मुंबईत आणि महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मनसेच अग्रभागी राहिली. काँग्रेसनं पुकारलेल्या बंदच्या केंद्रस्थानी काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते राहणं अपेक्षित होतं. काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनाची आगही दिसली नाही. आणि धगही दिसली नाही.

बंदचं सगळं श्रेय मनसेच्या आक्रमकपणामुळे मनसे कार्यकर्ते आणि त्यांचे नेते राज ठाकरेंना आपसुकच मिळालं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live