एक तास रांगेत उभं राहून राज यांनी केलं मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 एप्रिल 2019

मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप-शिवसेना युतीला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सुमारे एक तास रांगेत उभे राहून मतदान केले. राज मतदान केंद्रावर आल्याबरोबर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. पण राज यांनी आधी मतदान करायला जाणे पसंद केले. 

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राज दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी सहकुटुंब पोहोचले. मतदानासाठी मोठी रांग होती. सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. सुमारे एक तास रांगेत थांबल्यानंतर त्यांना मतदान करता आले. दरम्यान मुंबईत आज सेलिब्रीटी,कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदार रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावत आहेत. आतापर्यंतसर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे. व्हिव्हिपॅट मशिन मुळे एक मत नोंदवायला किमान सात सेकंद लागत असल्याने काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. 

WebTitle : marathi news MNS chief raj thackeray casted their in dadar mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live