(VIDEO) महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना ढोल-ताशांसारखं बडवा - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

पुणे - ‘‘जेवढ्या जोराने ढोलताशा बडवत आहात. तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर जे कोणी संकट आणतील त्यांनाही बडवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ढोलताशा पथकांना दिला. मनसे आयोजित ‘स्वरराज’ ढोलताशा करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे, नीलेश हांडे, मंदार बलकवडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोलताशा पथकांपैकी शिवसाम्राज्य पथकास प्रथम, तर समाधान पथकास द्वितीय व रुद्रतेज पथकास तृतीय पारितोषिक देऊन ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

ठाकरे म्हणाले, ‘‘ढोलताशा वादकांमध्ये आणि आमच्यामध्ये एकच साम्य आहे. ते म्हणजे बडवणे हे होय. ढोलताशाचा आवाज ऐकल्यावर सर्वांनाच आनंद होतो. ढोलताशा वादनाची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र संगीतकार अजय-अतुल यांनी या कलेला महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांना श्रेय  दिले पाहिजे.’’  

WebTitle  : marathi news mns chief raj thackeray to dhol tasha pandals 

संबंधित बातम्या

Saam TV Live