'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ' म्हणत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यंगचित्रातून निशाणा साधलाय. पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. आगामी निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री असेल. यामुळे लातूरकरांनी चिंता करू नये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

लातुरात असताना देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून टीका केलीये. 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीसांचा समाचार घेतलाय. 'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ' असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

संबंधित बातम्या

Saam TV Live