"उद्धवा, अजब तुझे सरकार" ; मनसे नेते असं का म्हणताय?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 जानेवारी 2020

मुंबई : मुंबई पोलिस दलात अश्वांचा समावेश करण्यात आल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हटले आहे.

जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलीस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं "उद्धवा अजब तुझे सरकार" pic.twitter.com/MhOnra2x6t

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 22, 2020

मुंबईत गुरुवारी (ता. 23) मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे नव्या रुपाने समोर येणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वीच मनसे नेते राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलिस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं... उद्धवा अजब तुझे सरकार. त्यांनी यापूर्वीही सरकारच्या निर्णयावर टीका केलेली आहे. तसेच अधिवेशनानिमित्त मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा..., असे ट्विट त्यांनी अधिवेशनापूर्वी केलेले आहे. त्यामुळे आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

Web Title: MNS leader Sandip Deshpande target Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Saam TV Live