आषाढीला पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी परवानगी द्यावी, मनसेची मागणी

साम टीव्ही
शुक्रवार, 26 जून 2020

एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट आहे. सर्व महत्वाची मंदिरं बंद आहेत. अशातच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील नागरिकांना  विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडे केलीय.

एकीकडे राज्यावर कोरोनाचं संकट आहे. सर्व महत्वाची मंदिरं बंद आहेत. अशातच आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील नागरिकांना  विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाकडे केलीय. यंदा आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येण्यास सक्त मनाई करण्यात आलीय. तसच मागील 15 दिवसांपासून  कोरनाचा संसर्ग असलेला कोणताही रुग्ण पंढरपुरात आढळलेला नाही. त्यामुळे एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन पंढरपुरातील नागरिकांना करू द्यावं. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत सॅनिटायझरचा वापर करून या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य संघटक दिलीप धोत्रे यांनी केलीय. 

दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर शहर आणि आसपासच्या दहा किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. २९ जून ते २ जुलै पर्यंत पंढरपुरात कडक संचारबंदी असणार आहे. आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.मात्र यंदा कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर पंढरपुरात गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी संचारबंदीचा निर्णय घेतलाय.देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात येणार आहे... आज हे पथक गुजरातमध्ये दाखल होईल... तर उद्या हे पथक महाराष्ट्रात येईल.. महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४.७ इतका आहे.  राष्ट्रीय पातळीवरील सरासरी मृत्यूदर ३.२ टक्के आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी ठाणे, पुणे, पालघर आणि सोलापूरमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. तर महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये मृत्यूदर सहा टक्क्यांवर जाऊन पोहोचलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live