महाराष्ट्राला कर्मभूमी मानणारं बॉलिवूड गप्प का ? - मनसे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली हे जिल्हे गेल्या काही दिवसांपासून पुराचा सामना करत आहेत. त्यांच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्तरातील लोक पुढे येत असताना महाराष्ट्राला कर्मभूमी मानणारे बॉलिवूड कलाकार कुठे आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. 

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरून महाराष्ट्राला गरज असताना पूरग्रस्तांकडे पाठ फिरवणाऱ्या बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे. खोपकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट लिहली असून त्यात पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरानंतर समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणाचे कौतुक केले आहे. मात्र त्याचवेळी ‘लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है’, असं म्हणत हिंदी कलाकारांवर टीका केली आहे.

मराठी कलाकारांबरोबरच बॅकस्टेज आर्टिस्टही मदतकार्यात सहभागी झाल्याबद्दल खोपकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. शेवटी महाराष्ट्रातील लोक त्यांच्या लोकांसाठी झटत राहतील, असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live