आज मनसे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

सरकारनामा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मुंबई : भारतात अवैध वास्तव्य असलेल्या पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसे रविवारी (ता. 9) दक्षिण मुंबईत मोर्चा काढणार असून, गेटवे ऑफ इंडिया ते वरळी सी-लिंकपर्यंत महाराष्ट्र पोलिस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर मोर्चाचा परिसर आणि मॅरेथॉनच्या मार्गावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.

मनसेचा मोर्चा आणि पोलिस मॅरेथॉनमुळे पोलिसांसाठी रविवार महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे. पोलिसांच्या मॅरेथॉनदरम्यान नागरिकांची रस्त्यावर गर्दी होणाची शक्‍यता आहे. त्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिस, विभागीय पोलिस अधिकारी, अंमलदार, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस आदी विभाग सज्ज झाले आहेत.

पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे अतिरिक्त 850 अधिकारी आणि अंमलदार तैनात केले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने मॅरेथॉन शर्यतीवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या वेषातील पोलिस पथके गस्त घालणार आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणाकडे विशेष लक्ष असेल. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. मनसेच्या मोर्चामुळे संपूर्ण दिवस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live