ऑफ ट्रॅक मनसेला राष्ट्रवादीचा आधार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मनसेनं आता हातमिळवणीचं तंत्र अवलंबण्यास सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वच जागा लढण्याऐवजी ज्या जागा जिंकता येतील अशा 30 ते 50 जागांवरच मनसे आपलं लक्ष केंद्रीत करणार असल्यांचं बोललं जातंय. अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार आगपाखड केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर राज ठाकरे कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करतांना दिसतायेत.

सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मनसेनं आता हातमिळवणीचं तंत्र अवलंबण्यास सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वच जागा लढण्याऐवजी ज्या जागा जिंकता येतील अशा 30 ते 50 जागांवरच मनसे आपलं लक्ष केंद्रीत करणार असल्यांचं बोललं जातंय. अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार आगपाखड केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर राज ठाकरे कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करतांना दिसतायेत. राजकीय रणनितीचाच एक भाग म्हणून मनसे आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार असल्याचं बोललं जातंय. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live