स्वतंत्र निवडणूक लढवायची झाल्यास मनसेचा रोडमॅप तयार

स्वतंत्र निवडणूक लढवायची झाल्यास मनसेचा रोडमॅप तयार

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. भाजप-शिवसेनेकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. मात्र, मनसेच्या गोटात मात्र वातावरण थंड असल्यानं मनसेच्या आगामी भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंज इथं पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवायची की नाही, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, स्वतंत्र निवडणूक लढवायची झाल्यास मनसेचा रोडमॅप तयार असल्याचं कळतंय.

मनसेची 63 मतदारसंघांत निश्चित ताकत आहे. त्यातल्या किमान 25 मतदारसंघांत निकराची लढाई दिली जाऊ शकते. या मतदारसंघांवर मनसेनं लक्ष केंद्रित करायचं ठरवलंय. त्यासाठी काही उमेदवारांची नावंही चर्चेत आली आहेत.

आदित्य शिरोडकर- शिवडीतून, नितीन सरदेसाई - माहीम, अभिजीत पानसे - ठाणे, नितीन नांदगावकर - विक्रोळी, संतोष धुरी - वरळी, अविनाश जाधव - ठाणे, संजय तुर्डे - कलिना, राजू पाटील- कल्याण ग्रामीण यांच्यासह सुमारे 34 ते 35 उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

शिवसेना-भाजप युतीचं जागावाटप निश्चित झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र आणखी थोडं स्पष्ट होईल. तिथल्या असंतुष्टांनाही मनसेत संधी मिळू शकेल..मात्र,त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com