खड्ड्यांवरुन मनसेचे खळखट्याक;  PWD च्या कार्यालयाची जोरदार तोडफोड 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 जुलै 2018

सायन- पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसेनं खळखट्याक आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची जोरदार तोडफोड केलीय.. या तोडफोड प्रकरणी पाच मनसेच्या पदाधिका-यांना अटक केलीय.

सायन- पनवेल हायवेवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. हे खड्डे अपघातासाठीही कारणीभूत ठरत आहेत. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीन दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली होती. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम सुरु झालं मात्र ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं बोललं जातंय 

संबंधित बातम्या

Saam TV Live