आजपासून पुन्हा 'ए लाव तो व्हिडिओ' 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 एप्रिल 2019

मुंबई - संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका मंगळवारपासून (ता. 23) सुरू होत आहे. ठाकरे यांच्या सभेतील "अरे लाव रे तो व्हिडिओ'ला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असतानाच त्यांच्या सभेतील ऑडिओ-व्हिडिओ चित्रीकरणाबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आतापर्यंत नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्याचे मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. महाडनंतर राज ठाकरे यांची मुंबईत सभा पार पडणार आहे. काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानात उद्या सभा होणार आहे. मनसेने बुधवारी (ता.24) सभेची परवानगी मागितली होती, मात्र मनसेला एक दिवस आधी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील काही भाग पिंजून काढल्यानंतर राज ठाकरे यांची तोफ आता मुंबईत धडाडणार आहे.  काळाचौकीतील सभेनंतर भांडूप, पनवेल व नाशिकला सभा होणार आहे. 

Web Title: marathi news mns raj thackeray public speeches in mumbai to start from today 

संबंधित बातम्या

Saam TV Live