राज ठाकरेंचं 'काप रे तो केक' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 जून 2019

राज ठाकरेंचा वाढदिवस हा मनसे कार्यकर्त्यांसाठी जणू एखादा सणच. या दिवशी आपले सगळे कार्यक्रम रद्द करून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात. याशिवाय एखादा राजकीय संदेश देणारा केक कापणं हे राज यांच्या वाढदिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य. 

राज ठाकरेंचा वाढदिवस हा मनसे कार्यकर्त्यांसाठी जणू एखादा सणच. या दिवशी आपले सगळे कार्यक्रम रद्द करून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात. याशिवाय एखादा राजकीय संदेश देणारा केक कापणं हे राज यांच्या वाढदिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य. 

यंदाही राज यांनी शिवसेना भाजप युती सरकारचा निषेधाचा संदेश देणारा केक कापला. या केकवर शिवसेना आणि भाजपला उद्देशून लाचार आणि फेकू असे शब्द लिहिलेले हातही दाखवण्यात आले होते. एक प्रकारे लोकसभा निवडणुकीत राज यांनी घेतलेली सेना भाजपविरोधी भुमिका आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहिल, असा संदेश राज यांनी दिल्याचं मानलं जातंय.

यापुर्वीही परप्रांतियांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाच्या वेळी राज यांनी भैया असे शब्द लिहिलेला केक कापला होता. तर एका वाढदिवशी असदुद्दीन ओवेसी यांचं चित्र असलेला केक कापून राज यांनी एमआयएमच्या महाराष्ट्रातील शिरकावावर अप्रत्यक्षपणे राजकीय भाष्य केलं होतं. याशिवाय एकदा ईव्हएम यंत्रांवर संशय व्यक्त करणारा संदेश देणारा केक कापून राज यांनी ईव्हीएम वापराला सुचकपणे विरोधक केला होता. 

राज ठाकरेंनी केलेल्या एखाद्या साधारण कृतीचीही कायमच चर्चा होते, हा आजवरचा अनुभव. शिवाय त्यांच्या प्रत्येक कृतीचे राजकीय अर्थ काढणंही आपल्याला नवं नाही. मात्र यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी शिवसेना भाजपला लक्ष्य करणारा केक कापत आपली पुढची राजकीय दिशा स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

WebTitle : marathi news MNS raj thackerays fiftyfirst birthday kap re toh cake 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live