शेतकऱ्यांसाठी MNS उतरणार रस्त्यावर; 17 मे रोजी ठाण्यात एल्गार

शेतकऱ्यांसाठी MNS उतरणार रस्त्यावर; 17 मे रोजी ठाण्यात एल्गार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला चांगलाच फेस आणला. त्यानंतर आता राज यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. 17 मे रोजी मनसेनं ठाण्यात आंदोलनाची हाक दिलीय.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता रस्त्यावर उतरावच लागेल असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला पुन्हा एकदा ललकारलंय. काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या नौपाडा भागात एका आंबा विक्रेत्याला हटवलं म्हणून मोठा राडा झाला. याच मुद्यावरून मनसे आक्रमक झालीय. शेतकऱ्यांना विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना ताळ्यावर आणण्यासाठी आवाज उठवावाच लागेल असं राज ठाकरेंनी एका पत्रकाद्वारे म्हंटलयं. 

सत्तेचा दुरूपयोग करून एका शेतकऱ्याला पिटाळलं जातं. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था लोकप्रतिनिधींना समजत नसेल तर त्यांना ताळ्यावर आणावच लागेल. म्हणूनच 17 मे रोजी मनसे ठाण्याच्या गावदेवी मैदानापासून ते महापालिकेवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्यांना इतर सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे भाग पाडणार आहे. इतर प्रश्नांवर राज्य स्तरावर जे काही करायचे ते मी करेनच मात्र तुर्तास याविरूद्ध आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. 

लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारानंतर राज ठाकरे आणखी आक्रमक होतांना दिसतायेत. दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय. आतापर्यंत शेतकरी आपल्यापरीनं लढा देताना दिसले. पण आता त्यांना राज ठाकरेंचंही पाठबळ मिळणारंय. त्यामुळे येत्या काळात राज विरूद्ध सरकार हा संघर्ष टिपेला पोहचलेला असेल. 

WebTitle : marathi news mns to start agitation against government to  support farmers 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com