शक्तीप्रदर्शनावरून मनसेचं तळ्यात-मळ्यात..

शक्तीप्रदर्शनावरून मनसेचं तळ्यात-मळ्यात..

राज ठाकरेंना ईडीकडून आलेल्या चौकशीच्या नोटिशीनुसार स्वतः राज ठाकरे 22 ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे या चौकशीला आपल्या नेहमीच्या स्टाइलनं उत्तर देईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली. राज ठाकरेंच्या चौकशीवेळी मुंबईत ईडीच्या कार्यालयाबाहेर मनसेचे सर्व कार्यकर्ते जमतील, असंही मनसेनं लगोलग जाहीर केलं. त्यासाठी मुंबईत खास पत्रकार परिषदेचा घाट घातला गेला. शिवाय हे आंदोलन शांततामय मार्गानं होणार, असाही दावा करण्यात आला.

एकीकडे मनसेकडून ही घोषणा होत असतानाच, काही क्षणातच दस्तुरखुद्द राज ठाकरेंचा निरोप आला मनसे कार्यकर्त्यांनो शांत राहा, असा निरोपच राज ठाकरेंकडून आलाय.

महाराष्ट्रात राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्यासह  मनसे कार्यकर्त्यांना ही ईडीची नोटीस प्रचंड जिव्हारी लागलीय. मनसेकडून होणारं शक्तिप्रदर्शन प्रचंड असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता यु टर्न घेत मनसेने हे शक्तिप्रदर्शनच थांबवण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द राज ठाकरेंनी एका पत्राद्वारे तशी घोषणा केलीय. मात्र ही माघार घेण्याचं नेमकं कारण काय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलीय.

WebTitle : marathi news MNS to start agitation against the notice of ED

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com