मनसेचा भाजपला पाठिंबा? नाशकात नवनिर्माण?

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

राज्यासह केंद्रातही शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर आता भाजपने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळे पर्याय तपासायला सुरूवात केलीय. नाशिकमध्ये अशाच एका वेगळ्या पर्यायाची चाचपणी केली जातेय. नेमकी काय राजकीय समीकरणं नेमकी काय असतील यामागे पाहूयात या सविस्तर पंचनाम्यातून...

भाजपने शिवसेनेसोबत काडीमोड घेतल्यानंतर आता अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधली समिकरणं बदलणार आहेत. नाशिकमध्ये याचाच प्रत्यय येत असून भाजपने महापौरपदासाठी मनसेच्या पाठिंब्यासाठी चाचपणी सुरू केलीय.
नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 22 तारखेला निवडणूक होतेय. गेली अडीच वर्षे या महापालिकेत भाजपचा महापौर आहे. मात्र आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडी सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक महापालिकेच्या एकूण १२० जागांपैकी भाजपचे ६५, शिवसेनेचे ३४, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकूण १४, मनसेचे ६, तर रिपाईचा एक नगरसेवक आहे. विशेष म्हणजे ऐन महापौरपदाच्या निवडणुकीपुर्वी भाजपचे १४ नगरसेवक फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे भाजप अल्पमतात जाण्याची शक्यता आहे. शिवाय नाशिक महापालिकेतही महाशिवआघाडीचं जमल्यास भाजपला हात चोळत बसावं लागेल.  त्यामुळे भाजपने हालचालींना सुरूवात केली असून मनसेच्या पाठिंब्याची चाचपणी सुरू करण्यात आलीय. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला थेट लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर नाशकात मनसे भाजपसोबत जाणार का हे पाहणं, मनोरंजक ठरणार आहे. अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.

Web Title - MNS supports bjp in nashik 

संबंधित बातम्या

Saam TV Live