मोबाईल सॅनिटाईज करताय? तर ही बातमी पाहाच

साम टीव्ही
गुरुवार, 30 जुलै 2020
  • मोबाईल सॅनिटाईज करताय ? सावधान
  • मोबाईलवर सॅनिटायजरचा वापर करणं पडेल महागात
  • सॅनिटायझर वापरल्यानं जाऊ शकतो मोबाईचा डिस्प्ले

तुम्ही जर मोबाईल सॅनिटाईज करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करत असाल तर सावधान. मोबाईलवर सॅनिटायझरचा वापर करणं तुम्हाला महागात पडू शकतं

कोरोनापासून बचावासाठी उपयोगात येणाऱ्या सॅनिटायजरचा वापर मोबाईलवरही करण्यात येतोय. मात्र मोबाईलवर सॅनिटायझरच्या अतिवापरानं मोबाईलचा डिस्प्ले उडण्याचे प्रकार घडतायंत. सॅनिटायझरची मोबाईलवर फवारणी केल्यानं त्याचे स्पिकरही खराब होत असल्याचं दिसतंय.

सॅनिटायझरमध्ये केमिकल असतात, ती मोबाईलवर पडल्यानं डिस्प्ले उडतो. त्यामुळे  असा सुरक्षित ठेवा मोबाईल 

  • मोबाईल साफ करण्यासाठी सोल्युशनचा वापर करा
  • रुमाल किंवा टिश्यू पेपरवर सॅनिटायजर मारुन मग त्याद्वारे मोबाईल निर्जंतूक करा
  • मोबाईलला कमीत कमी स्पर्श होईल, इतकाच वापर करा
  • मोबाईलसाठी प्लास्टिक कव्हरचा वापर करा
  • मोबाईलवर एखादवेळ पाणी पडलं तर त्याचा डिस्प्ले खराब होत नाही, पण मोबाईलवर सातत्यानं सॅनिटायझर फवारणी केली तर मात्र तुमच्या मोबाईलचा डिस्प्ले कधीही उडू शकतो. त्यामुळे मोबाईलवर सॅनिटायझरचा मारा करु नका


संबंधित बातम्या

Saam TV Live