लिंक ओपन करताच अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये गायब!

लिंक ओपन करताच अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये गायब!

सोलापूर : गुगलवरून मेक माय ट्रीपचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. विमानाचे तिकीट रद्द करण्यासाठी चौकशी केली. कस्टमर केअरने लिंक पाठविली. लिंक ओपन करताना मोबाईल हॅंग झाला आणि अर्धा तासात बॅंक खात्यावरून 95 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. सोलापुरात कपडे व्यापाऱ्याची ऑनलाइन फसवणुकीची घटना मंगळवारी समोर आली आहे. 

यश राजकुमार पंजवाणी (वय 25, रा. अंत्रोळीकर नगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. यश याने मोबाईलवरून गुगलवर जाऊन मेक माय ट्रीप कस्टमर केअर सर्च केले. तिथे मिळालेल्या क्रमांकावर यशने कॉल केला. हा बोलीऐ मैं रोहित बोल रहा हुं असे म्हणून समोरील व्यक्तीने संवादाला सुरवात केली. यशने त्याची कोइमतूर फ्लाईटचे तिकीट रद्द करण्याविषयी सांगितले.

आरोपी रोहित याने यशच्या मोबाईलवर लिंक पाठविली. यशने मी लिंक ओपन केली. त्यानंतर त्याचा मोबाईल हॅंग झाला. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर यशच्या पंजाब नॅशनल बॅंकेच्या कस्तुरबा मार्केट शाखेतील खात्यातून आरोपीने टप्याटप्याने 95 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना 3 जुलै 2019 रोजी ही घटना घडली असून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने यश पंजवाणी याने पोलिसात धाव घेतली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार तपास करीत आहेत.

Web Title: Mobile Hang Money Gone Fraud in Solapur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com