मोबाईलचा अतिवापर तुम्हाला मानसिक रुग्ण करु शकतो

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरणं तुम्हाला ठार वेडं करु शकतं. मानसोपचार तज्ज्ञांकडे 10 ते 15 टक्के रुग्ण मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेले असतात. एकट्या नागपुरात 50 हजार ते एक लाख लोकं ठार मोबाईलवेडे आहेत.

धक्कादायक म्हणजे, यातल्या बहुसंख्य लोकांना मोबाईलमुळे मानसिक आजाराकडे आपली वाटचाल होत असल्याचं ध्यानीमनीही नाही. यामुळं ते आणखी धोकादायक ठरतंय. 

मोबाईल सोडून दुसऱ्या कुठल्याही कामात मन लागत नसेल, सतत मोबाईल वाजल्याचा भास होत असेल तर ही मोबाईल व्यसनाची लक्षणं आहेत. त्यामुळं ही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live