मोबाईल चोरामुळे तरुणीचं आयुष्य उद्धवस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

लोकलच्या ट्रॅकशेजारी काठी मारुन मोबाईल चोरण्याच्या प्रकारामुळे एका तरुणीचं आयुष्य उद्धवस्त झालंय. मोबाईल चोरामुळे कल्याणच्या 23 वर्षीय द्रविता सिंगला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली आहेत. द्रविता नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. त्यावेळी फोनवर बोलण्याकरता ती लोकलच्या दरवाजावर गेली, तेव्हा तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. लोकलमधून ट्रॅकवर पडलेल्या द्रविताचा मोबाईल घेऊन चोर पसार झाला. मात्र दुर्दैवी द्रविताला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लोकलची धडक बसली.

लोकलच्या ट्रॅकशेजारी काठी मारुन मोबाईल चोरण्याच्या प्रकारामुळे एका तरुणीचं आयुष्य उद्धवस्त झालंय. मोबाईल चोरामुळे कल्याणच्या 23 वर्षीय द्रविता सिंगला आपला एक पाय आणि हाताची काही बोटं गमवावी लागली आहेत. द्रविता नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी लोकलने सीएसएमटीच्या दिशेनं जात होती. त्यावेळी फोनवर बोलण्याकरता ती लोकलच्या दरवाजावर गेली, तेव्हा तिच्या डोक्यावर बांबूचा जोरदार फटका बसला. लोकलमधून ट्रॅकवर पडलेल्या द्रविताचा मोबाईल घेऊन चोर पसार झाला. मात्र दुर्दैवी द्रविताला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या लोकलची धडक बसली. या घटनेचा द्रविताला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तिच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मोबाईल चोरासह एका महिलेला अटक केली आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live