मन की बात | ...आणि मोदींनी मागितली देशाची जाहिर माफी

मोहिनी सोनार
रविवार, 29 मार्च 2020

आज लोकडाऊनचा पाचवा दिवस आहे. त्यात लोकांचं प्रचंड नुकसान होतंय. मजूर, गरीब यांच्या जेवणाचे खूप हाल होतायत. मात्र लॉक डाऊन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे त्याचा लोकांना जो काही त्रास होतोय त्याची मोदींनी मॅन की बात या कार्यक्रमातून देशाकडून जाहीर माफी मागितली.

 

देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत. 

देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत. कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली सर्व जगतायेत. अशातच भारतातही कोरोना व्हायरस फोफावत जातोय याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमातुन जनतेला संबोधित केलं. यामुळे नव्या वर्षातील पंतप्रधानांचं हे तिसरं संबोधन होतं. यंदाच्या मन की बातमध्ये जगभरासह देशात फोफावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत नरेंद्र मोदींनी चर्चा केली. 

पाहा सविस्तर मोदी नेमकं काय म्हटले...

 

दरम्यान, नेहमीप्रमाणे मन की बातचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपमार्फत प्रसारित आला. यात मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं कळताच त्यांनी लवकरात लवकर लोकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. त्यात अनेकांना याचा त्रास झाला असेल मात्र देश वाचवण्यासाठी हे कारण अत्यंत महत्वाचं असल्याचं मोदींनी म्हटलं. आणि तुम्हाला जो काहो त्रास होतोय त्याची मी जाहीर माफी मागतो असंही मोदी म्हणाले. 

यासह जे लोक लोकडाऊनचे नियम मोडतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल असं मोदींनी ठणकावून सांगितलं. 


संबंधित बातम्या

Saam TV Live