''मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींच गिफ्ट दिलं''- राहुल गांधी

''मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींच गिफ्ट दिलं''- राहुल गांधी

फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. 

नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे नाव सुचवले होते यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. 

राफेल करारावर मोदी अजूनही गप्प आहेत हे थक्क करणारे आहे. भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कोणीतरी परदेशी अध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांना चोर म्हटले आहे, हे खूपच निंदनीय असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

30 हजार कोटींचे बक्षिसच मोदींनी अनिल अंबानी यांनी हे दिल्यासारखे आहे. अनिल अंबानींच्या कंपनीला मिळालेले हे कंत्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच शिफारशीनुसार मिळालेले असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला. स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेणारेच देशाचे चोर निघाले, हेच देश लुटण्यासाठी उद्योगपतींना मदत करत आहेत. नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. जवानांच्या भविष्याची आणि भ्रष्टाचाराची ही गोष्ट आहे, 30 हजार कोटींचे बक्षिस मोदींनी अंबानींना दिले आहे

त्याचबरोबर, देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यादेखील खोटे बोलत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यायचे सोडून हे पळवाटा शोधत आहेत, या मुद्यावर भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

Web Title: rahul gandhi criticise on BJP government on Rafeal deal
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com