राहुल गांधीना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 जून 2019

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, असे पंतप्रधानांनी बुधवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे

काही दिवसांपूर्वीच संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांवर कडवी टीका केली होती. राफेल विमानांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदींवर आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपला लोकसभेत पूर्ण बहुमत दिले आहे. राहुल गांधी यांनी निकालांच्या दिवशीच पत्रकार परिषदेत जनतेचा आदेश आम्हाला मान्य असल्याचे म्हटले होते आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

web title:  Modi gives birthday wishes to Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Saam TV Live