काश्मीरप्रश्नी केंद्र सरकार आक्रमक; राजनाथ सिंह यांचा फुटिरतावाद्यांना इशारा

काश्मीरप्रश्नी केंद्र सरकार आक्रमक; राजनाथ सिंह यांचा फुटिरतावाद्यांना इशारा

दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारनं काश्मीरप्रश्नी आक्रमक पवित्रा घेतलाय. काश्मीर प्रश्न सोडवायचाच या दृष्टीनं  सरकारनं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. काश्मीरमध्ये जवानांनी धडक कारवाई करत अनेक दहशतवाद्यांना यमदसनी पाठवलंय. त्यानंतर फुटीरतावाद्यांविरोधात सरकारनं कडक धोरण स्वीकारलं.

काश्मीरमधल्या युवकांची माथी भडकावणाऱ्या फुटीरतावाद्यांची मुलं मात्र परदेशात मस्त आयुष्य जगत असल्याचा पर्दाफाश करत फुटीरतावाद्यांचा बुरखा टराटरा फाडलाय. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फुटीरतावाद्यांना जोरदार इशाराच देऊन टाकलाय. जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा इशारा त्यांनी दिलाय.

सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्सची पॉलिसी मोदी सरकारनं अवलंबलीय. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानलाही जागतिक स्तरावर उघड पाडून त्याची कोंडी करण्याचं धोरणही भारतानं स्वीकारलंय. काश्मीरमध्येही सुरक्षा रक्षकांनी कडक पावलं उचलल्यानं दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झालीय. आता फुटीरतावाद्यांना कडक इशारा देत पुढील पाच वर्षात काळात काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा असणार आहे.

WebTitle : marathi news modi government kashmir Defence minister rajnath singh to separatist

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com