मोदी सरकारचा गरीब जनतेच्या खिशावर 12 लाख कोटींचा डाका : अमित देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

लातूर : केंद्रातील मोदी सरकारला पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले आहे. या सरकारने गेल्या पाच वर्षात पेट्रोल व डिझेलची भाव वाढवून कराच्या माध्यमातून देशातील गरीब जनतेच्या खिशावर 12 लाख कोटींचा डाका घातला आहे. या पैशाचे काय केले याचे मोदी सरकारने उत्तर देशातील जनतेला द्यावे अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आमदार अमित देशमुख यांनी येथे केली.

पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ देशमुख यांच्या नेतृत्वात सोमवारी लातूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. येथील उषाकिरण पेट्रोलपंपावर देशमुख यांनी आंदोलनात स्वतः सहभाग घेतला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयांचे श्री. देशमुख यांनी पुष्प देवून स्वागत करीत निवेदन दिले. पेट्रोल डिझेलच्या कराच्या माध्यमातून मोदी सरकारने 12 लाख कोटी रुपये तिजोरी पडले आहेत. हा देशातील सामान्यांच्या खिशावर हा डाकाच आहे. या पैशातून त्यांनी महाघोटाळा केला आहे. याचे उत्तर मोदी सरकारने देशातील जनतेला दिले पाहिजे. राज्य सरकारने तर कहर केला आहे. दुष्काळी कर लावला आहे. त्यामुळे येथे पेट्रोल डिझेल अधिक किंमतीला मिळत आहे.

काग्रेस नेहमीच सामान्यासोबत राहिला आहे. सामान्यांचा विजय हाच काँग्रेसचा विजय आहे, असे श्री. देशमुख म्हणाले. यावेळी `भाजप हटाव, देश बचाव`, `मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय` अशा घोषणा देण्यात आल्या.

Web Title: modi government looted 12 lakh crores said amit deshmukh

संबंधित बातम्या

Saam TV Live