VIDEO | 'दंगलखोर मोदींची महाराजांशी तुलना होणं चूक'

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 14 जानेवारी 2020

सध्या सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केल्यामुळे वादंग उठलंय. प्रत्येक जो महाराजांवर प्रेम करतो त्याला हे आवडलेलं नाही किंवा त्याला असं केलेलंच मुळी चालणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जो तो आपापल्या पद्धतीने याला विरोध करतोय. यातंच विरोधकांना चांगलं फावतंय. अशात एका व्यक्तीनं मोदींना थेट दंगलखोराचीच उपमा दिलीय. आणि मोदींसारख्या दंगलखोराची तुलना महाराजांशी करणं योग्य नाही असं वक्तव्य केलंय. हे वक्तव्य साताऱ्याच्या श्रीमंत कोकाटे यांनी केलंय. काय म्हणाले कोकाटे पाहा हा व्हिडीओ...

साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना कोकाटे यांनी मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. या वेळी बोलत असताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे महापुरुष आहेत त्यांची तुलना कोणाशी ही होऊ शकत नाही मोदींच्या सारख्या  दंगलीखोर व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना  शिवाजी महाराजांची तुलना करणं हा त्यांचा अवमान आहे.मोदि आणि शिवाजी महाराज यांच्या विचारधारेत मोठी तफावत आहे.मोदी यांनी गुजरात मध्ये पोलिसांना हाताशी धरून दंगली घडवल्या आहेत. मोदी यांची विचारधारा स्त्रियांचा अवमान करणारी आहे.
अशा प्रकारे मोदी आणि भाजपवर कोकाटेंनी घणाघात केलाय. 

Web Title -  modi is Rioter says shrimant kokate 

संबंधित बातम्या

Saam TV Live