VIDEO | मोदींनी साधला महाराष्ट्राच्या नर्सशी संवाद! पाहा काय म्हणाले मोदी

साम टीव्ही
शनिवार, 28 मार्च 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील परिचारिकांशी फोनवरुन संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील परिचारिकांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी तुम्ही स्वत:ची नीट काळजी घेत आहात ना असं म्हणत  रुग्णालयातल्या य़ा परिचारकांची विचारपूस त्यांनी केली. रात्री पावणे आठच्या सुमारास पंतप्रधान कार्यालयातून नर्स छाया जगताप यांना फोन आला. आणि त्यांनी नर्सेसचे काम कसे सुरु आहे याची माहिती घेत रुग्णालयातील नर्सेसची विचारपूस करत त्यांना धीर दिला..यावेळी पेशंटची भीती घालवण्यासाठी नर्सेस काय करतात याची माहिती छाया यांनी पंतप्रधानांना दिली. दरम्यान देशभरात हजारो नर्सेस कोरोना रोगाचा सामना करत आहेत. त्या सगळ्यांना शुभेच्छा देत मोदींनी त्यांचे आभारही मानलेत.

पाहा, व्हिडीओ -

Web Title - marathi news modi talk to nurse of maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live