MODI VS THACKERAY | कोरेगाव-भीमा तपासावरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जुंपली

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 29 जानेवारी 2020

कोरेगाव-भीमा तपास प्रकरणी आता राज्य विरुद्ध केंद्र असा सामना रंगताना दिसतोय. तपास कुणी करायचा? यावरनं केंद्राला राज्यानं जोरदार विरोध केलाय.
कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरनं आता केंद्र आणि राज्य़ सरकारमध्ये जुंपलीय.  NIA ला कागदपत्रं द्यायला पुणे पोलिसांनी नकार दिला, पोलिस महासंचालकांची परवानगी घेऊनच NIAला सहकार्य केलं जाईल अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली. दुसरीकडे NIA ची टीम राज्यातआली हे माध्यमांमधूनच कळलं, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. 

NIA ला अजूनही पुणे पोलिसांकडून कोणतीही कागदपत्रं मिळालेली नाहीत. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या साऱ्या घटनाक्रमावरुन भाजपनं राज्य सरकारवर टीका केलीय.

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास करायचा कुणी यावरनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जुंपलीय. मोदी सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा उघड उघड संघर्ष सुरु झालाय. मात्र यामुळे तपासाचं भिजत घोंगडं मात्र कायम आहे, हेही विसरुन चालणार नाही.

संबंधित बातम्या

Saam TV Live