मोहम्मद शमी विरुद्ध अजामिनपात्र गुन्हा दाखल

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 मार्च 2018

कोलकाता - टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी शमीवर भारतीय दंडविधानानुसार अजामिनपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये खूनाचा प्रयत्न, बलात्कार, मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीबरोबर त्याच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्याची आई अंजुमन आरा, बहिण सबिना अंजुम, भाऊ 
मोहम्मद हसीब अहमद आणि भावाची पत्नी शामा परवीन यांचा समावेश आहे. 

नुकत्याच लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला होता. एवढेच नाही, तर शमीच्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले होते. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला होता. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट आहेत. शमी बरोबर त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहां यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही तिने म्हटले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live