मोहन भागवतांच्या उपस्थित रायगडावरील कार्यक्रमाला जाणे तटकरे कुटूंबियांनी टाळले 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित रायगडावर पार पडलेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह संपूर्ण तटकरे कुटूंबिय अनुपस्थित राहिले. या कार्यक्रमासाठी तटकरे यांनी डॉ. भागवत यांना पायघड्या घातल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. या टिकेनंतर खुद्द सुनील तटकरे यांनी या कार्यक्रमाशी आमचा काही संबध नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. 

हनुमान जयंतीच्या मुहर्तावर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला तटकरे व त्यांची कन्या व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी गैरहरज रहाणे पसंद केले. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून मोहन भागवत यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर निमंत्रक म्हणून सुनील तटकरे व आदिती तटकरे यांचे नाव असल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. विशेष म्हणून कार्यक्रम पत्रकेवर मोहन भागवतांचा उल्लेख " पुजनीय" असा केल्याने राष्ट्रवादीसाठी आरएसएस प्रमुख पुजनीय कधीपासून झाले असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात होता. त्याच वेळी शिवपुण्यतिथीनिमीत्त रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमाचा तटकरे कुटूंबियांशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले होते. 

शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमाला तटकरे यांच्यासह त्यांचे बंधू अनिल तटकरे, त्यांचे पुत्र अवधूत तटकरे आदींचा प्रमुख उपस्थितांमध्ये समावेश होता. संपूर्ण तटकरे कुटूंबिय या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live