लोकशाही आता अधिक परिपक्व झाली आहे - मोहन भागवत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूर : केंद्रातील कणखर सरकारने कलम 370 हटविण्यासारखा मोठा निर्णय घेतला. जनसंघाची पहिल्यापासून ही मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा हा धाडसी निर्णय अभिनंदनीय आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

नागपूरमधील रेशीमबाग येथे आज (मंगळवार) विजयादशमीनिमित्त संघाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी देशासंबंधी विविध विषयांवर भाष्य केले. या कार्यक्रमाला एचसीएलचे प्रमुख शिव नाडर उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

भागवत म्हणाले, ''लोकशाही आता अधिक परिपक्व झाली आहे. साहसी निर्णय घेण्याची मोदी सरकारमध्ये क्षमता आहे. गेले वर्ष देशासाठी वैशिष्ट्यपूर्ण होते. लोकांना बदल हवा होता तो 2014 मध्ये घडला. 2014 मध्ये ज्या सरकारला निवडून दिले होते. त्यानंतर यंदा पुन्हा आणखी जागा सरकारला मिळाल्या. खूप काळानंतर देशात चांगल्या गोष्टी घडत आहेत. देशातील अंतर्गत दहशतवाद कमी होत आहे.'' 
 
चांद्रयान 2 मोहिमेमुळे आपल्याला विश्वास मिळाला आहे. देशात सध्या उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. चांद्रयान यशस्वी झाले नसले तरी जगाचे लक्ष वेधले. अजून आपल्याला खूप पुढे जायचे आहे. आम्ही काहीही करू शकतो हा देशात विश्वास निर्माण झाला आहे. आपला देश आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत, हे आपल्याला पाहायला मिळाले आहे, असे भागवत यांनी सांगितले. 

Web Title: Mohan Bhagwat congratulate Narendra Modi and Amit Shah in RSS in Nagpur on the occasion of VijayaDashami


संबंधित बातम्या

Saam TV Live