#ViralSatya - सावधान! तुम्हीही 'मोमो' गेमच्या आहारी नाही गेलात ना ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

2016 मध्ये ब्लू व्हेल गेमने संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवली होती. या भयानक गेमने अनेकांचा जीव घेतला. पण, त्यापेक्षाही भयंकर असा 'मोमो' हा नवीन गेम आला आहे. हा गेम खेळला की तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकता इतका हा भयानक गेम आहे. एकदा तुम्ही 'मोमो' गेममधील चॅलेंज स्विकारलात की तुम्ही त्यामध्ये गुंतत जाता आणि शेवटी आत्महत्येस तो गेम भाग पाडतो. ब्लू व्हेल चॅलेंजच्या ओळीत बनलेल्या मोमोच्या आव्हानामुळे लॅटिन अमेरिकन देशांतील लोकांची झोप उडाली आहे. 'मोमो व्हॉटस्ऍप' एक क्रमांक आहे. जो व्हॉटस्ऍपवर शेअर केला जातोय. सगळ्यात आधी फेसबुकवरून लोकांना नंबर देण्यात आला. 

कसं असतं 'मोमो चॅलेंज'? 
- यूजरला नंबर पाठवतात, नंबर सेव्ह केल्यावर मेसेज येतो
- नंबरवर फोन करण्यासाठी आव्हान दिलं जातं 
- नंबरवरून भयानक फोटो, व्हिडिओ येतात
- वैयक्तिक माहिती उघड करण्याची धमकी दिली जाते
- यूजरला काही टास्क दिले जातात
- टास्क पूर्ण न केल्यास त्यांना धमकी देतात
- धमकीला घाबरून युजर आत्महत्येस प्रवृत्त होतो

'मोमो' गेमला चॅलेंज देताना परदेशात एका मुलीनं आत्महत्या केली. आता हा गेम भारतातही वेगानं पसरत चाललाय. अनेकांच्या मोबाईलमध्ये हा गेम दिसू लागलाय. पण, मोमो हा गेम खेळणं जीवघेणं ठरू शकतं.

Web Title : marathi news momo whatsapp game challenge worst than blue whale  

संबंधित बातम्या

Saam TV Live