सोमवार ठरतोय अपघातवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई-गोवा महामार्गावर बसनं ट्रकला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. अपघातात बसचालक जागीच ठार झालाय. सिंधुदुर्गच्या कासार्डे इथं हा भीषण अपघात घडलाय. धुकं असल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

कासर्डे इथेच ऊसाचा ट्रक रस्ता सोडून बाहेर पडलाय

मुंबई गोवा महामार्गावर आणखी एक अपघात झालाय. महामार्गावर कासर्डे इथेच ऊसाचा ट्रक रस्ता सोडून बाहेर पडलाय. महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुकं पसरल्यानं चालकाला रस्त्याचा अंदाजच आला नाही आणि त्यातच हा अपघात झालाय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

भिवंडीत कंटेनर पलटी

भिवंडीत पावडर घेऊन जाणाऱ्या एका कंन्टेनरचा अपघात झालाय. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा कंटेनर पलटी झालाय. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने हा कंटेनर चालला होता. त्यामध्ये काच बनविण्यासाठीची पावडर होती. मुंबई नाशिक हायवेवर भिवंडी राजनोली जक्शन जवळ ओवळी खिंड इथं हा अपघात झाल्याने वाहतुक ठप्प झालीय.. कल्याण वाहतूक ही पाईपलाईन रोड - खारेगाव टोल, मुब्रां बायपास मार्गे वळविण्यात आलीय.

बुलडाण्यात कंटेनरनं एका ऑटो रिक्षाला उडवलंय

बुलडाण्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खामगांव ते अकोला रोडवर कलोरी या गावफाट्या नजिक कंटेनरनं एका ऑटो रिक्षाला उडवलंय. त्यात तीन जण गंभीर जख्मी झालेत. पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून जख़मींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live