बँकेतील तुमचा-आमचा पैसा सुरक्षित नाही; बँकांमधील पैशांची लूट सुरुच

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

बँकांमधला तुमचा-आमचा पैसा सुरक्षित नाहीये कारण बँकांमधील पैशांची लूट सुरुच आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित १८ सार्वजनिक बँकांमध्ये फसवणुकीच्या २,४८० घटना घडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या घटनांमध्ये तब्बल ३२,००० कोटींचा चुना बँकाना लागलाय. कॅनरा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांसह जवळपास सर्वच सरकारी बँकांना चालू अर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहित फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. बँकांमध्ये ठेवलेला हा पैसा तुमचा आमचा आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी आरबीआयकडे आरटीआयअंतर्गत अर्ज दाखल करुन चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या बँक फसवणुकीच्या घटनांची आकडेवारी मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना आरबीआयनं जी आकडेवारी समोर ठेवलीय ती धक्कादायक आहे. त्यामुळे बँकांमध्ये ठेवलेला तुमचा-आमचा पैसा सुरक्षित नाही, असं म्हणायला वाव आहे.

WebTitle : marathi news money in bank is not safe as we always wanted to be 

संबंधित बातम्या

Saam TV Live