मॉन्सून २८ मे रोजी केरळात - स्कायमेट

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 मे 2018

पुणे - नैॡत्य मोसमी वारे (माॅन्सून) यंदा नियमित वेळेच्या चार दिवस अगोदर म्हणजेच २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे. मॉन्सून २० मे राेजी अंदमान आणि निकोबार बेटावर, तर २४ मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल, असे स्कायमेटच्या हवामानशास्त्र विभागाचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी स्पष्ट केले आहे. 

दीर्घकालीन सरासरी वेळेनुसार मान्सून साधारणत: एक जून रोजी केरळात दाखल होतो. यंदा तो चार दिवस आधीच केरळमध्ये पोचेल असे स्कायमेटने म्हटले आहे. तर भारतीय हवामान विभागाने यंदाच्या पावसाळ्यात समान्य पावसाचा दीर्घकालीन अंदाज दिला आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: ४२ टक्के असेल, तर सरासरीपेक्षा अपुऱ्या कमी पावसाची शक्यता १४ टक्के तर सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता १२ टक्के असेल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live