मॉन्सूनचे केरळात आगमन; हवामान विभागाची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे. 

अंदमानात नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने (२५ जून) दाखल झालेल्या माॅन्सूनने वेगाने प्रगती सुरू ठेवली आहे. रविवारी (ता. २७) अंदमान बेटांच्या बहुतांशी भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली तर दुसऱ्याच दिवशी साेमवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापून केरळच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पुर्ण केला. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव - कोमोरीन परिसर, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, पूर्वमध्य, अग्नेय भागामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.  अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस चाल मिळाली आहे.

अरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी ठळक झाले होते. यातील कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कमी दाब  तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) केरळला सोमवारी धडक दिली असल्याचे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. केरळमध्ये मॉन्सूनसदृश स्थिती असल्याने देशात पावसाचा हंगाम सुरू झाला असल्याचे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंग यांनी सांगितले. तर बाहेर पडणाऱ्या दीर्घ किरणोत्सर्गी लहरी, दोन दिवस पडलेला पाऊस, वाऱ्यांची दिशा पाहता मॉन्सून केरळात दाखल झाल्याचे स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी म्हटले आहे. चार दिवस आगोदरच यंदा मॉन्सून दाखल झाला आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live