यंदा महाराष्ट्रात पाऊसच पाऊस... 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 एप्रिल 2018

उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील.  इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांसह, बळीराजासाठी स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने गुड न्यूज दिली आहे. यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरात पाऊसमान सामान्य राहील.  इतकंच नाही तर मराठवाड्यातही यंदा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live