मान्सून आठवड्याच्या शेवटी पुन्हा सक्रीय होण्याची आशा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

राज्यातील आगमनादरम्यान रेंगाळलेला मान्सून या आठवड्याच्या शेवटी पुन्हा सक्रीय होण्याची आशा आहे. आज कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज असून, गुरुवारी कोकणात अतिवृष्टीचा इशारा असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार पावसावर परिणाम करणाऱ्या 'मेडन-जुलियन ऑस्सिलेशन' घटकाची भारतामध्ये सक्रियता वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा येथे मेघगर्जनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेंगाळलेल्या पावसाला चालना मिळायला सुरुवात झाली आहे. 23 जूनपासून या ठिकाणच्या पावसाच्या व्याप्तीमध्येही सुधारणा दिसू लागेल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live