बंदरांवर लागला तीन नंबरचा बावटा; मान्सून संदर्भार्त वाईट बातमी.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जून 2019

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रातील 'वायू' चक्रीवादळ बुधवारी आणखी जोर धरण्याचा इशारा हवामान विभागानं दिला..यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील पावसाचं आगमन काही दिवसांनी लांबणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. दरम्यान समुद्र खवळणार असल्यानं मासेमारांनी पुढील दोन दिवस समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. 

१२ आणि १३ जून असे दोन दिवस अरबी समुद्रात उत्तर पूर्व भागात आणि गुजरातच्या किनाऱ्यावरही 'वायू' चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून खोल समुद्रात गेलेल्यांनी तत्काळ माघारी यावं असं आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

राज्याच्या किनारपट्टीवर समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मान्सूनच्या आगमनावर झाला असल्याचं दिसून येतंय. मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता आहे. 

मान्सूनच्या आगमनासाठी दक्षिणेकडील वार्‍यांचा जोर आवश्यक आहे. मात्र सध्या समुद्रातील चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात वादळी वारे वाहत आहेत. मान्सूनसाठी ही पोषक स्थिती नाही. या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांचा जोर वाढलाय. समुद्र खवळला असून पाण्याच्या पातळीतही मोठी वाढ झालीय. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून बंदर विभागाच्यावतीने बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आलीय. 

WebTitle : marathi news monsoon might be delayed for few more days due to vayu cyclone 

संबंधित बातम्या

Saam TV Live