शुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपर्यंत कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये अतिजोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

WebTitle : marathi news monsoon rainfall maharashtra konkan vidarbha 

संबंधित बातम्या

Saam TV Live