मान्सून केरळात दाखल; येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातही धडकणार मान्सून 

अमोल कविटकर
शनिवार, 8 जून 2019

मान्सूनचं आगमन लांबणीवर पडल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अखेरीस 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभरानं मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. गेल्या केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसतायेत. मात्र मान्सूनचं केरळमधील आगमन लांबल्यानं महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहचणार असा अंदाज होता. आता नव्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही धडक देण्याची शक्यता आहे. मान्सूनं केरळमध्ये धडक दिल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झालीय.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार : 

  • पुढील 24 तासांत मान्सूनची ईशान्य भारतातील शाखा सक्रिय होणार 
  • 8 जूनला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
  • 9 जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहील. काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातली जनता पावसाची चातकासारखी वाट पाहतीय. मान्सून केरळात धडकल्यानं आता सगळ्यांचेच डोळे आभाळाकडे लागलेत. 

Web Title : marathi news monsoon reaced kerala expected to hit in maharashtra within two days 

संबंधित बातम्या

Saam TV Live