यंदाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मे 2019

मुंबई  - विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जेमतेम चार महिनेच शिल्लक असल्याने येणारे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारसाठी महत्त्वाचे असणार आहे. १७ जूनपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प सादर केला जाणार असून, त्यात घोषणांचा पाऊस पडणार असल्याची शक्‍यता आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत होणार असल्याची अधिसूचना आज काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने या वेळी आकर्षक घोषणांचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. राज्यातला दुष्काळ, कर्जमाफी, धनगर आरक्षणासारख्या प्रश्‍नांना या अधिवेशनात राज्य सरकारला सामोरे जावे लागणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या पाच वर्षांचा लेखाजोखा सरकारला मांडता येणार आहे. 

Web Title: marathi news monsoon session of maharashtra state assembly will be conducted in mumbai

संबंधित बातम्या

Saam TV Live