पावसामुळे पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

पुणे : दीर्घ प्रतीक्षेनंतर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाने आज (शुक्रवार) हजेरी लावली. आता लोणावळा आणि काससारख्या पर्यटकांच्या लाडक्‍या ठिकाणीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उद्या (शनिवार) आणि परवा (रविवार) या दोन्ही ठिकाणी पावसात भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होईल. 

यंदा पावसाने उशीरा हजेरी लावली; पण लोणावळ्यामध्ये शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांमध्ये 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. 

आंदर मावळ आणि वडगाव परिसरातही जोरदार पाऊस आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीसाठी आकाशाकडे डोळे लावलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

पावसाच्या आगमनामुळे पश्‍चिम महाराष्ट्र सुखावला आहे. ढग आणि धुक्‍यामध्ये कासचा परिसर हरवला आहे. सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावडाव धबधबाही वाहू लागला आहे. उत्तर कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातूनही पर्यटक येथे दाखल होत असतात. 

संबंधित बातम्या

Saam TV Live